Election Results : शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची हॅट्ट्रिक

श्रीधर ढगे
गुरुवार, 23 मे 2019

खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे.

खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे.
गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुकींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखाली लिड आणि विजय असे समीकरणच बनले आहे. घाटाखाली तीन विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी मलकापूर हा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो तर खामगाव व जळगाव जामोद हे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात येत असून दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत खामगाव व जळगाव जामोद मतदारसंघातून लिड मिळाला होता. त्यामुळे यावेळी या मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना किती लिड मिळतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु यावर्षी सुद्धा दोन्ही मतदारसंघातून जाधव यांना 70 हजारच्यावर लिड मिळाला असल्याने प्रतापराव जाधव यांच्या विजयात घाटाखालील लिड किती महत्त्वाचा ठरला हे स्पष्ट झाले आहे.
बुलडाणा लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेना व मित्र पक्ष युतीचे खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणे, वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात लढत झाली. खा. प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक अवघड जाईल असे चित्र होते. मात्र मोदी करिश्‍मा प्रतापराव जाधव यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे, तसेच भाजपा आमदार व कार्यकर्त्यांनी दिलेली समर्थ साथ खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी जमेची बाजू ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election results: hat-trick of Shiv Sena candidate Prataprao Jadhav