विद्यार्थी निवडणुकांसाठी पैसे द्या

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका महाविद्यालयस्तरावर घेण्यासाठी बराच खर्च येणार आहे. हा खर्च महाविद्यालयांना विद्यापीठाकडून मिळावा, अशी मागणी प्राचार्यांनी केली. गुरुवारी (ता. 11) दुपारी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात दीक्षान्त सभागृहात प्राचार्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्यांच्या विविध प्रश्‍नांसमोर प्रशासन निरुत्तर झाल्याचे चित्रही दिसून आले.
विद्यापीठाला 31 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पार पाडायच्या आहेत. यासाठी विद्यार्थी संघटनांच्या बैठकीचे चार दिवसांपूर्वी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आणि एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी संघटनेला देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेला जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर गुरुवारी (ता. 11) प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्राचार्यांनी निवडणुकादरम्यान पाच वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिकांची छपाई आणि इतर साहित्यासाठी किमान दहा हजारांचा खर्च येणार असल्याने तो खर्च विद्यापीठाने द्यावा, अशी मागणी केली. तसेच निवडणुकीदरम्यान विद्यार्थी संघटनांच्या हस्तक्षेपाला थांबविण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत विद्यापीठाने करून देण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी प्रशासनाकडून अमान्य करण्यात आली. यावर प्राचार्यांनी त्यावर आक्रमक होत, विद्यापीठात सुरक्षेवर खर्च केला जात असल्यास थोडा खर्च महाविद्यालयांवरही व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत, तो पैसा विद्यार्थ्यांसाठीच असल्याचे स्पष्ट केले. यावर पोलिस प्रशासनासोबत बोलण्याचे आश्‍वासन कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com