अधिकृत एजन्सीकडेच वीजबिलाचा भरणा करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

महावितरणचे नागरिकांना आवाहन - शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

नागपूर - वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरणा महावितरणद्वारे नियुक्त अधिकृत एजन्सीद्वारे करावा. तसेच ऑनलाइन वीजबिल भरताना एखाद्या एजन्सीबाबत शंका आल्यास शहानिशा करूनच भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणचे नागरिकांना आवाहन - शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

नागपूर - वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरणा महावितरणद्वारे नियुक्त अधिकृत एजन्सीद्वारे करावा. तसेच ऑनलाइन वीजबिल भरताना एखाद्या एजन्सीबाबत शंका आल्यास शहानिशा करूनच भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ओळखीतील ग्राहकांचे बिल एकत्र करून कमिशनवर त्यांचा भरणा करण्याचा उपक्रम अनेक जण करतात. वेळेत बिलाचा भरणा न झाल्यास विलंब शुल्क आकारले जाते. ग्राहकांना याबाबत माहिती नसते. पुढील महिन्यातील बिलात शुल्क लागून आल्यावर ग्राहकांचा  राग अनावर होतो. काही ठिकाणी महावितरणचे परवानगी नसलेले अनधिकृत ऑनलाइन वीजबिल भरणा केंद्रे वीजबिलांचा भरणा करून घेतात. परंतु, पैशांचा भरणा महावितरणकडे करीत  नसल्याची प्रकरणे पुढे आली आहेत.

अनधिकृत केंद्रांमुळे वीजबिल भरूनही त्याची नोंद महावितरणकडे होत नाही. तसेच राज्यात काही ठिकाणी अनधिकृत व्यक्तीने बिलांचा भरणा न करता बनावट पावत्या दिल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. बिल भरल्याची नोंद महावितरणकडे झाली नसल्यास संबंधितांचा वीजपुरवठा खंडित  केला जातो व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

पावती अवश्‍य घ्यावी
महावितरणने नियुक्त केलेले अधिकृत ऑनलाइन वीजबिल भरणा केंद्र महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनी वीजबिल भरल्यावर त्याची पावती अवश्‍य घ्यावी. पावतीवरील ग्राहक क्रमांक, पावती क्रमांक बघून घ्यावा. तसेच ऑनलाइन वीजबिल भरताना आवश्‍यकता वाटल्यास खात्री करण्यासाठी मुंबईतील मुख्य कार्यालयाशी ०२२-२६४७८२४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: electricity bill give to authorized agency