वीज थकबाकी वसुलीसाठी महावितरणची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

गोंदिया - महावितरण गोंदिया परिमंडळात घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक असे पाच लाखांच्या वर ग्राहक आहे. या ग्राहकांकडे परिमंडळातील भंडारा व गोंदिया मंडळात  कोट्यवधींची थकबाकी आहे.

थकबाकी वसूल करण्याचे गोंदिया परिमंडळापुढे आवाहन आहे. यासाठी महावितरण गोंदिया परिमंडळाने कंबर कसली आहे. महावितरणने वीज देयके वसूल करण्याची विशेष मोहीमच हाती घेतली आहे.

गोंदिया - महावितरण गोंदिया परिमंडळात घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक असे पाच लाखांच्या वर ग्राहक आहे. या ग्राहकांकडे परिमंडळातील भंडारा व गोंदिया मंडळात  कोट्यवधींची थकबाकी आहे.

थकबाकी वसूल करण्याचे गोंदिया परिमंडळापुढे आवाहन आहे. यासाठी महावितरण गोंदिया परिमंडळाने कंबर कसली आहे. महावितरणने वीज देयके वसूल करण्याची विशेष मोहीमच हाती घेतली आहे.

महावितरण मुंबई मुख्यालयाच्या संयुक्त मोहीम कार्यक्रमाअंतर्गत विशेष वसुली व वीज खंडित करण्याची मोहीम अंतर्गत विशेष वसुली व वीज खंडित करण्याची मोहीम जानेवारी महिन्यापासून सतत तीन महिने म्हणजेच मार्चपर्यंत तसेच यापुढे ही सुरू असणार आहे. गोंदिया परिमंडळाने या आदेशाची अमंलबजावणी करण्याकरिता संयुक्त कृती कार्यक्रम परिमंडळ स्तरावर थकबाकी वसुलीसाठी आठ विशेष वसुली मोहीम पथक स्थापित करण्यात आले आहेत. 

या पथकामध्ये कार्यकारी अभियंता, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ लेखा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व समकक्ष महावितरण अधिकारी सामील करण्यात आले आहेत. हे सर्व अधिकारी परिमंडळात सर्व चारही विभागात (गोंदिया, देवरी, भंडारा व साकोली विभाग) विशेष वसुली व वीज खंडित करण्याच्या मोहिमेअंतर्गत अंमलबजावणी करणार आहे. अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा ) एस. आर. कांबळे यांना परिमंडळ स्तरातील  सर्व चमूंवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

सदर वसुली पथक १८ जानेवारीपासून कार्यरत झाले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वीज ग्राहकांनी वीजबिल भरल्याची पडताळणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिवसाला करीत आहेत. परिमंडळातर्फे वीजबिल वसुली व्हावी, यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्टसुद्धा देण्यात आले आहेत. अशाच पथकाचे गठन मंडळ व महावितरणच्या चारही विभागात करण्यात आले आहे. 

सदर पथक थकबाकी असलेले वीज ग्राहकांनी थकबाकी भरली की नाही, हे तपासणे, खंडित वीजपुरवठा झालेल्या ग्राहकांचे वीज मीटर तपासणे, मोठ्या ग्राहकांचे व सरकारी कार्यालयातील वीजबिल भरले की नाही, याची चौकशी करणे आदी महत्त्वपूर्ण कामांची जबाबदारी या पथकाकडे आहे. महत्त्वाचे म्हणजे महावितरण अधिकाऱ्यांना कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

आतापर्यंत कृषिपंप थकबाकी यादीनुसार ५३ थकबाकीदार ग्राहकांनी मागील ३ दिवसांत २.५३ लाख रुपये महावितरण कार्यालयात जमा केली आहे. शासनाचे वतीने महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत ३१ मार्चपर्यंत कामकाज, वीजपुरवठा बंद केलेल्या कृषी ग्राहकांसोबत इतर ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेऊन थकबाकीच्या रकमेतून सुटका करण्याचे निवेदनही करण्यात येत आहे.

Web Title: Electricity distribution company for the recovery of outstanding campaign