पाड्यापर्यंत पोहोचली वीज

file photo
file photo

अमरावती : मेळघाटातील अतिदुर्गम भागातील शेवटच्या आदिवासी पाड्यांना वीज पुरवठा करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा मानस असलेल्या महावितरणने अती दुर्गम भागात वसलेल्या भांडूम या आदिवासी पाड्याचे विद्युतीकरण पूर्ण केले असून लवकरच याच परिसरातील चोबिता आणि लाखेवाडी महावितरणच्या प्रकाशात लखलखणार आहे. 

अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता श्रीमती सुचित्रा गुजर यांनी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदेसह बुधवारी (ता.27) या अतिदुर्गम भागात अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू असलेल्या वीज कामाची पाहणी केली. सोबतच मुख्य अभियंता यांनी लाखेवाडी येथील शेतकरी जग्गू केंडे चिलाटी या शेतकऱ्यांच्या शेतात मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजनेत बसविलेल्या सौरपंपाचीही पाहणी केली.

सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेल्या मेळघाटातील दऱ्याखोऱ्यातून अतिदुर्गम भागातील या आदिवासी पाड्यांना वीज पुरवठा करणे हे महावितरणसाठी केवळ कस पणाला लावणारे नसून दिवास्वप्न साकार करणारे आहे, कारण घनदाट आणि व्याघ्रप्रकल्प असल्याने प्रवेश बाधित असलेले क्षेत्र, रस्ता नसल्याने वीज खांबाची, वीज वाहिन्यांची वाहतूक कशी करायची, दऱ्याखोऱ्यात विजेचे खांब कसे टाकायचे, त्यावरून वीज वाहिन्या कशा टाकायच्या, वादळ, वारा, पावसात एखादे झाड या वाहिनीवर पडून प्रसंगी अनर्थ घडू नये असे अनेक प्रश्न समोर असताना मुख्य अभियंता श्रीमती गुजर यांनी वनविभाग, तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे आणि अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक आघाव, तसेच मे गुप्तेश्वर आणि सर्वज्ञ या कंत्राटदारांसोबत वारंवार बैठका घेऊन अनेक प्रश्नावर मात करत वनविभाग यांच्या सहकार्याने मेळघाटात प्रकाश पेरण्याला सुरवात केली आहे.

या तीनही आदिवासी पाड्यांचे काम हे आदिवासी उपयोजनेत करण्यात येत आहे. यासाठी एकूण 2 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या देखरेखित आणि कार्यकारी अभियंता दीपक आघाव यांच्या नेतृत्वात अतिदुर्गम भागातील या पाडयांच्या विद्युतीकरणासाठी उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर,सहाय्यक अभियंता परेश वासनकर यांच्यासह गुप्तेश्वर एजन्सीचे गाडवे,सर्वज्ञ या एजन्सीचे चौधरी हे महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com