यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

यवतमाळ - जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला असून, पांढरकवडा व घाटंजी तालुक्‍यांत वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला.
खैरगाव (ता. पांढरकवडा) येथील शेतातून अक्षय शेडमाके (रा. आकपुरी, ता. यवतमाळ) व शंकर घोडाम (रा. वाघोली, ता. पांढरकवडा) हे घरी परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शिरोळी (ता. घाटंजी) प्रभाकर विधाते व त्यांची पत्नी गंगा विधाते शेतात गेले असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचाही मृत्यू झाला.

Web Title: electroluction 4 death of Yavatmal district