Video : मुख्यमंत्र्यांच्या चित्रासह पोहोचली विधिमंडळात, काय म्हणते ही चिमुकली? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

आई मोलमजुरी करते. 15 महिन्यांपूर्वी भाडे देत नसल्याच्या कारणावरून घर मालकाने घरच काबीज करून त्यांना बाहेर काढले. घरातील कोणतेही साहित्य दिले नाही. पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्यांनी काहीच कारवाई केली नाही. घरातच सर्व वह्या आणि पुस्तके आहेत. पुस्तके नसल्याने तिला शाळेत जाता येत नाही.

नागपूर : घरमालकाने घर काबीज केले. सर्व पुस्तके घरीच राहिली. घरमालक साहित्य देत नसल्याने चिमुकली तेजस्विनीला शाळेत जाता आले नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नवीन पुस्तकेही खरेदी करता येत नाही. मुख्यमंत्र्यांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या मागण्यासाठी तिने अकोल्यावरून विधानभवन गाठले. सोबत मुख्यमंत्र्यांचा काढलेला फोटोही आणला आहे. हे रेखाचित्र त्यांना भेट द्यायचे असल्याचे तिने सांगितले. 

तेजस्विनी सावंत अकोल्यातील मोहरीदेवी खंडेलवाल शाळेत सातव्या वर्गात शिकते. तिला वडील नसून आजोबांकडे राहते. आई मोलमजुरी करते. 15 महिन्यांपूर्वी भाडे देत नसल्याच्या कारणावरून घर मालकाने घरच काबीज करून त्यांना बाहेर काढले. घरातील कोणतेही साहित्य दिले नाही. पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्यांनी काहीच कारवाई केली नाही. घरातच सर्व वह्या आणि पुस्तके आहेत.

पुस्तके नसल्याने तिला शाळेत जाता येत नाही. तर नव्याने पुस्तक घेण्याची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे. धाकट्या भावासह शिक्षण घेण्यासाठी धडपडत असलेल्या तेजस्विनीने आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी अकोल्याहून थेट नागपूरचे विधानभवन गाठले. आपल्या मागणीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काढलेले रेखाचित्रही त्यांना भेट देण्यासाठी सोबत आणले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी तिने हे चित्र तयार केले.

हेही वाचा - Video : हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले आंदोलक, मोर्चा शांततेत

शिक्षणासाठी सातवीतील तेजस्विनीची धडपड 
नावाप्रमाणेच तेजस्वी स्वभावाच्या तेजस्विनीने आपण शिक्षण घेण्यासाठी ही धडपड करीत असल्याचे सांगितले. तिने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे आदींची रेखाचित्रे काढली होती. तिची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी अद्याप भेट झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eleven year school girl came to visit CM at nagpur vidhan bhavan