अकरावीची प्रवेश प्रक्रिया 3 सप्टेंबरपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

नागपूर : दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 30) जाहीर झाला. या परीक्षेत उत्तीर्ण आणि एटीकेटीस पात्र ठरलेल्या 50 हजार 667 विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावीची प्रवेश प्रक्रिया 3 सप्टेंबरपासून राबविण्यात येईल. विभागातून 9 हजार 229 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

पहिल्या तीन फेरींमध्ये अकरावीच्या 22 हजार 501 जागा भरल्या होत्या. मात्र, त्यानंतरही सुमारे 35 हजार 741 जागा रिक्त असल्याने 9 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन केले होते. या फेरीत विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर 14 ऑगस्टला विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येऊन 16 ते 19 ऑगस्टदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. शुक्रवारीच दहावीचा निकाल लागल्याने आता यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आणि एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रथम प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना 17 सप्टेंबरपर्यत अर्जाचे दोन्ही भाग भरायचे आहेत. 3 सप्टेंबरलाच महाविद्यालयांना अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील जागा सरेंडर करता येणार आहे. सात सप्टेंबरला ऑनलाइन रिक्त जागा प्रकाशित करण्यात येतील.
शहरातील 58 हजार 240 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील जवळपास सर्वच शाखांमध्ये 32 हजार 229 जागा रिक्त आहेत. कला शाखेत आतापर्यंत केवळ 1 हजार 960 जागांवरच प्रवेश झाले आहेत. वाणिज्य शाखेत 6 हजार 680 तर विज्ञान शाखेत 16 हजार 306 जागांवर प्रवेश झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The eleventh admission process is from September 3