अकरावीची गुणवत्ता यादी आज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नागपूर - अकरावी प्रवेश प्रक्रियेतील द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दुसऱ्या फेरीपासून बंद करण्यात आले. त्यामुळे आता कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेतील प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. उद्या, मंगळवारी (ता. ३) या सर्वच शाखांमधील जागांसाठी आलेल्या अर्जांनुसार गुणवत्ता प्रकाशित करण्यात येणार आहे. 

अकरावी प्रवेशासाठी मे महिन्यापासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात करण्यात आली. ८ जूनला दहावीचा निकाल लागल्यावर दोन दिवसांत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. यानुसार २५ जूनपर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एससीव्हीसी शाखेतील जागांसाठी अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सांगण्यात आले. 

यामध्ये कला शाखेसाठी १ हजार ८६२ अर्ज, वाणिज्यसाठी ८ हजार ४४१, विज्ञानसाठी १८ हजार ६७४ तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी ४१७ अर्ज असे एकूण ३३ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. उद्या, मंगळवारी (ता. ३) प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाणार आहे. पाच जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येईल. सात जुलैला पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रकाशित होऊन प्रवेशास सुरुवात होईल. दरम्यान, यावेळी गुणवत्ता यादी आणि प्रवेश यादीमध्ये कुठलाही घोळ होऊ नये याबद्दल काळजी घेण्यात यावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून  करण्यात आली आहे.

अर्जाची शाखानिहाय स्थिती 
कला  - १,८६२ 
वाणिज्य  - ८,८४१
विज्ञान  - १८,६७४
एमसीव्हीसी - ४१७
द्विलक्षी अभ्यासक्रम (रिक्त जागा) - ५,०८६

Web Title: eleventh merit list admission