एल्गार परिषदेतील डॉ. शोमा सेन निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

नागपूर - पुण्यातील एल्गार परिषदेचे आयोजन करून कोरेगाव भीमामधील दंगलीस चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली सहा जून रोजी पाच जणांना पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ. शोमा सेन यांचा समावेश होता. अद्याप त्या पोलिस कोठडीत असल्याने विद्यापीठाने आठ दिवसांनंतर त्यांना निलंबित केले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी दिली.

पुणे पोलिसांच्या पथकाने नक्षली कारवाईत सहभागी असल्याच्या आरोपाखाली बुधवारी पहाटे ऍड. गडलिंग, डॉ. शोमा सेन आणि महेश राऊत यांच्या घरांवर छापे घातले. त्यात पोलिसांना बरीच कागदपत्रे हाती लागली. त्या आधारावर पोलिसांनी डॉ. सेन यांना अटक करून पुण्यातील न्यायालयात सादर केले होते. तिथे पाचही जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या डॉ. सेन कोठडीत आहेत. डॉ. सेन या तीस वर्षांपासून इंग्रजी विभागात प्राध्यापक असून, दोन वर्षांपूर्वी त्या विभागप्रमुख झाल्या. 31 जुलैला त्या सेवानिवृत्त होणार आहेत.

Web Title: elgar conferance dr. shoma sen suspend