Fraud
FraudSakal

फ्लॅट खरेदी व्यवहारात साडे तेवीस लाखांचा अपहार

फ्लॅट खरेदीसाठी पुरेशी रक्कम दिल्यानंतरही बांधकाम पूर्ण करून न देता एका व्यक्तीची 23 लाख 42 हजार रुपयांनी फसवणूक
Summary

फ्लॅट खरेदीसाठी पुरेशी रक्कम दिल्यानंतरही बांधकाम पूर्ण करून न देता एका व्यक्तीची 23 लाख 42 हजार रुपयांनी फसवणूक

अमरावती - एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरील फ्लॅट खरेदीसाठी पुरेशी रक्कम दिल्यानंतरही बांधकाम पूर्ण करून न देता एका व्यक्तीची 23 लाख 42 हजार रुपयांनी फसवणूक केली. स्वप्निल अशोकराव तराह (रा. खंडेलवाल नगर, अमरावती) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गुरुवार (ता. २७) आक्टोबर रोजी या प्रकरणात फ्रेझरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध अपहार विश्वासघात प्रकरणी गुन्हा दाखल केला. रुपेश गजानन बुरघाटे (वय ३०), अंकुश गजानन बुरघाटे (वय ३२), गजानन बुरघाटे (वय ५७, सर्व रा. आनंद विहार, कठोरा रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुरघाटे यांच्या मालकीचे सुंदरलाल चौकात माई रेसिडेन्सी अपार्टमेंटचे बांधकाम झाल्यावर याच रेसिडेन्सी मधील तिसरे माळावरचा क्रमांक ४०१ हा विकत घेण्याचा करारनामा तराह यांनी केला होता. त्यासाठी रक्कम २२ लाख रुपये मुळ रक्कम, इसार १ लाख ४२ हजार रुपये स्टॕम्प ड्युटीसह असे एकूण २२ लाख ४२ हजार रुपये, स्वप्निल तराह यांनी बुरघाटे यांच्याकडे दिली होती. संबंधितांकडून ३० एप्रिल २०२० पर्यंत प्रत्यक्ष ताबा देण्याचे करारनाम्यात नमूद करण्यात आले होते. परंतु बांधकाम पूर्ण झाल्यावरही स्वप्निल तरह यांना संबंधितांनी दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही. आपली बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केली. अशी तक्रार स्वप्निल तराह यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशीयंती आपला अहवाल पोलिसांकडे सादर केला. स्वप्निल तराह यांच्या तक्रारीवरून अखेर फ्रेझरपुरा पोलिसांनी आज २७ ऑक्टोबर रोजी अपहार, विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com