कर्मचारी संपावर, यंत्रणा ठप्प

विवेक मेतकर
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

काही ठिकाणी अधिकारी खुर्चीत बसल्याचे दिसून आले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळावरही परिणाम झाला आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, आदी मागण्यांसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱय़ांच्या आहेत.

अकोला : राज्यातील शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. मंगळवारी (ता. 7) जिल्ह्यातील तृतीय व चतुर्थ शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम शासकीय यंत्रणाच ठप्प झाली आहे. सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट राहिला.

काही ठिकाणी अधिकारी खुर्चीत बसल्याचे दिसून आले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळावरही परिणाम झाला आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, आदी मागण्यांसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱय़ांच्या आहेत. वारंवार मागणी करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 7 ते 9 आॅगस्ट हे तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय या कर्मचाऱयांनी घेतला आहे.

यामध्ये अकोला जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद तसेच इतर विभागातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर कर्मचारी संघटनेच्या वतीने ठिय्या करण्यात आला. कर्मचारीच संपावर गेल्याने सर्वच कार्यालयात शुकशुकाट आहे. सर्व कामे ठप्प झाली आहेत.

Web Title: Employees on Strike Administration Stopped