अमरावतीच्या पेपरफूट प्रकरणात "लक्षवेधी'

file photo
file photo

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पेपरफुटीचे प्रकरण आता राज्याच्या विधानसभेत गाजण्याचे संकेत आहेत. कॉंग्रेसच्या आमदारांनी यासंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली असून, या प्रकरणाची माहिती विद्यापीठाकडे मागण्यात आली आहे.
लक्षवेधी संदर्भातील माहिती शासनाने विद्यापीठ प्रशासनाला मागितली असून, तशी माहिती तडकाफडकी पाठविण्यात आली. यासंदर्भात आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी लक्षवेधी मांडण्यात आल्याने विद्यापीठाकडून माहिती पाठविण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. विद्यापीठाने मंगळवारी (ता. 18) ही माहिती पाठविली आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फ्रेजरपुरा पोलिसांनी फुटलेले अभियांत्रिकीचे पेपर ज्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्‌सऍपवर पोचले त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे बयाण आज नोंदविणे सुरू केले, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी दिली. विद्यापीठांतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बी.ई. (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली.
आशीष श्रीराम राऊत व निखिल अशोक फाटे या दोघांना जिल्हा न्यायालयाने शनिवारी (ता. 15) जामीन मंजूर केला. पेपरफूट प्रकरणात पीयूष तायडे, स्वप्नील लांडगे या दोघांचे बयाण यापूर्वीच झालेले आहे. प्रकरणातील मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर बोरे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व अंतरिम जामिनासाठी अर्ज सादर केला, असे पोलिसांनी सांगितले. बोरे हा वाशीमच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात लिपिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com