इंग्रजी वापराने बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावले - डॉ. वेदप्रताप वैदिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नागपूर - इंग्रज गेले; मात्र इंग्रजी भाषेतून आजही बरेच व्यवहार व शासकीय कामे केली जातात. व्यवहार आणि कामात इंग्रजीच्या अत्यावश्‍यक वापराने नागरिकांची जीभ कापल्यासारखेच झाले. तोंडात जीभच नसल्यास नागरिकांचे बोलण्याचे स्वातंत्र्यच हिरावल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी केले.

रायसोनी शिक्षण समूहातर्फे आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी संसदेत ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी खासदार ॲड. राम जेठमलानी, न्यायमूर्ती व्ही. सी. डागा व रायसोनी शिक्षण समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी उपस्थित होते. देशातील व्यवहारात हिंदी किंवा त्या-त्या क्षेत्रातील प्रादेशिक भाषेचा वापर करावा. त्याबद्दल आग्रही असावे. तसे होताना दिसत नाही. न्यायालयात तर ते दिसत नाही, असे डॉ. वैदिक म्हणाले. ॲड. राम जेठमलानीसुद्धा हिंदीतून सर्वोच्च न्यायालयात बोलल्यास तो इतिहास होईल असा टोलाही त्यांनी लगावला.

अभिव्यक्तीसाठी विचारक्षमता असावी लागते. त्याला कायदा मदत करू शकतो. मात्र, आजपर्यंत ज्यांनी विचार केला, त्यांना मोठी किंमत मोजावी लागल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी न्यायमूर्ती व्ही. सी. डागा यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार सुरू  असल्याची भूमिका मांडली. सोशल मीडियाद्वारे बऱ्याच प्रमाणात नको त्या बाबींकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. संचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले.

Web Title: English use the word freedom seize