मांजामुळे उडतेय प्राणज्योत!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

नागपूर - चायना मांजा विक्रीतून व्यापारी, दुकानदार भरपूर कमाई करतात. मात्र या मांजापासून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व पशू-पक्ष्यांसह मानवाला उद्‍भवणारा धोका कित्येक पटीने अधिक असून, आतापर्यंत मांजामुळे शेकडो पक्षी, प्राणी आणि माणसांचेही बळी गेले आहेत.

नागपूर - चायना मांजा विक्रीतून व्यापारी, दुकानदार भरपूर कमाई करतात. मात्र या मांजापासून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व पशू-पक्ष्यांसह मानवाला उद्‍भवणारा धोका कित्येक पटीने अधिक असून, आतापर्यंत मांजामुळे शेकडो पक्षी, प्राणी आणि माणसांचेही बळी गेले आहेत.

मकरसंक्रात उत्सव साजरा करण्यासाठी आधी तिळगुळ, विविध फळांनी मुलांची लूट, हळदी-कुंकू इत्यादी कार्यक्रम, उपक्रम राबविले जायचे. आताही हे कार्यक्रम होतात परंतु, त्यापेक्षा मकरसंक्रात म्हणजे पतंग उडविण्याचा सन, अशी व्याख्या झाली आहे. सुरवातीला करमणूक, खेळ म्हणून पतंग उत्सवाची ख्याती होती. आता मात्र तो एक मोठा व्यवसाय झाला असून, पतंग, मांजा विक्रीतून कोट्यवधीचा व्यवसाय होत आहे. 

पूर्वी पतंगीला धागा बांधून तो उडविण्यात मुलांना आनंद मिळायचा, आता पतंग कापण्याची स्पर्धा चालते आणि त्यासाठी काचेची चुर लावलेला, न तुटनारा, लायलाॅनचा चायनिज मांजा सऱ्हास वापरला जातो. मात्र त्यातून आनंद आणि मजा लूप्त होऊन पर्यावरणाचा ऱ्हास, पशुपक्षांच्या आरोग्यासह मानवाच्या जिवाला धोका अधिक झाला आहे.

चायनीज मांजा टाळा
चायनीज मांजा वापराव बंदी असली तरी, छुप्या मार्गाने अधिक दराने चायनीज मांजाची विक्री होते. परंतु, त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने, पालकांनी संभावित धोके लक्षात घेता पाल्यांना, काचेचा, नायलॉन, चायनीज मांजा विकून घेणे टाळावे तसेच मुलांनीसुद्धा साध्या धाग्याचा उपयोग करून केवळ पतंग उडविण्याच आनंद घ्यावा, असे आवाहन सामाजिक संस्थांनी केले आहे.

मांजा’चे धोके
  पतंग कटल्यानंतर मांजा रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, रिक्षा स्वाराच्या गळ्यात अडकून अपघात होतो.
  मांजा पकडण्यासाठी धावणारे मुले वाहनांखाली येऊन अपघात होतो. गड्ड्यांमध्ये पडून जखमी होतात.
  चिमुकल्यांचे मांजामुळे हात कापतात, नाक, कान व शरीराच्या अनेक भागांवर जखमा होतात.
  मांजामध्ये अडकून पक्षी, छोटे प्राणी दगावतात.
  लहान मुले मांजा दाताने तोडत असताना, काचा पोटात जाऊन आरोग्य बिघडते, ओठ कापतात.
  जागोजागी पडलेले चायनीज माजाचे गुचके प्रदूषण पसरवितात.
  उकड्यावरील अन्न, पदार्थ्यांवर पडलेला मांजा खाण्यावाटे प्राण्यांच्या पोटात जाऊन विकार होतात.

Web Title: Environmental degradation from Manja and the danger of human beings with animal-birds