अपहृत अभिजितचा दगडाने ठेचून खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

अभिजित येथील गोधणी रोडवर असलेल्या केंद्रीय विद्यालयात वर्ग सहावीत शिकत होता. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता. 13) दुपारी पावणेदोनला सायकल घेऊन शिकवणीला गेला होता. सायंकाळी चारपर्यंत तो शिकवणी वर्गात उपस्थित होता. मात्र, उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. वडील दीपक टेकाम यांनी घरी आल्यानंतर मुलाबद्दल पत्नीकडे विचारणा केली. तेव्हा अभिजित घरी आलाच नाही, असे त्यांना सांगण्यात आले.

यवतमाळ : शिकवणी वर्गाला गेलेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करून दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. 14) दुपारी बाराला येथील सूरजनगर परिसरात उजेडात आली. या घटनेने शहरातील पालकांत खळबळ उडाली आहे. अभिजित दीपक टेकाम (वय 13, रा. डेहणकर ले-आउट, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. 

अभिजित येथील गोधणी रोडवर असलेल्या केंद्रीय विद्यालयात वर्ग सहावीत शिकत होता. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता. 13) दुपारी पावणेदोनला सायकल घेऊन शिकवणीला गेला होता. सायंकाळी चारपर्यंत तो शिकवणी वर्गात उपस्थित होता. मात्र, उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. वडील दीपक टेकाम यांनी घरी आल्यानंतर मुलाबद्दल पत्नीकडे विचारणा केली. तेव्हा अभिजित घरी आलाच नाही, असे त्यांना सांगण्यात आले. मित्रांकडे विचारणा केली असता, शिकवणी वर्गातून सायकल घेऊन तो निघून गेला, असे त्याच्या वडिलांना सांगण्यात आले. त्यानंतर शोध घेऊनदेखील अभिजित आढळला नाही. त्यामुळे अवसान गळालेल्या दीपक टेकाम यांनी वडगाव रोड पोलिस ठाणे गाठून मुलगा हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लगेच शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, आज शनिवारी दुपारी बाराला सूरजनगर परिसरातील भूत बंगल्यानजीक एक बेवारस सायकल पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी अभिजितचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले. या घटनेची माहिती होताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली. अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. हा खून अल्पवयीन मुलांनी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

Web Title: esakal news murder of 13 year old child

टॅग्स