गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात एस्सेलचे ‘वर्ल्ड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी एस्सेल समूहाने हिरवी झेंडी दाखवली. यामुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती मिळणार आहे. ४५२ कोटींच्या या प्रकल्पात २५२ कोटी एस्सेल समूहाचा तर २०० कोटी राज्य सरकारचा वाटा आहे. प्रकल्पाच्या विकासासाठी खासगी-सार्वजनिक सहभागातून नवीन कंपनी स्थापन झाल्यानंतर गोरेवाडा प्रकल्पाला मूर्त रूप मिळेल.  

गोरेवाडा प्राणिसंग्रहालय खासगी-सार्वजनिक सहभागातून (पीपीपी) करण्यासाठीची मुंबई येथे वनसचिव विकास खारगे, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामबाबू यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात एस्सेल समूहाने प्रकल्पासाठी सरकारने १८३ ऐवजी २०० कोटी रुपये द्यावे या प्रस्तावावर चर्चा झाली.

सरकारने त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन १७ कोटी रुपये वाढविले आणि २०० कोटी देण्यास मंजुरी दिली. निधीची अडचण दूर झाली. त्यामुळे एस्सेल समूहाने एफडीसीएमच्या साहाय्याने गोरेवाडा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याची तयारी दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या प्रकल्पाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला. प्रकल्पाच्या विकासासाठी आतापर्यंत सहा वेळा निविदा काढल्या होत्या. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने कोणीच स्वारस्य न दाखविल्याने प्रकल्प  रखडला होता. आता एस्सेल समूहाचे सारथ्य लाभल्याने प्रकल्पाच्या विकासाला गती मिळणार आहे. या प्राणिसंग्रहालयामुळे नागपूर शहर व परिसरात पर्यटनाला चालना मिळून रोजगार संधीत वाढ होणार आहे.

पहिल्या टप्प्यात इंडियन सफारी
पहिल्या टप्प्यात इंडियन सफारी होणार असून, त्यात वाघ, बिबट, अस्वल ही सफारी २५ हेक्‍टरमध्ये राहणार आहे. तृणभक्षक सफारी ४० हेक्‍टरमध्ये होईल. आफ्रिकन सफारीमध्ये झेंब्रा, सिंह, जिराफ आणि गेंडा राहणार आहे.

Web Title: essel world in gorewada zoo