प्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर

अनिल कांबळे
रविवार, 25 मार्च 2018

पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे
हक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे
हक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे पोलिस निवासस्थानांचे निर्माण कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज रविवारी नागपूर पोलिस आयुक्‍तालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस महासंचालक डॉ. सतीश माथूर, पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌, सहआयुक्‍त
शिवाजी बोडखे, महापौर नंदा जिचकार आणि जि.प. अध्यक्षा निशाताई सावरकर  उपस्थित होत्या.

Web Title: every police man will get own house their rights