ईव्हीएममध्ये घोळ असल्याच्या तक्रारींचा पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत पराभूत उमेदवारांनी आज अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांचे भेट घेतली. पराभवानंतर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले असून, त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना तक्रारींचा गठ्ठाच सादर केला. 

नागपूर - महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत पराभूत उमेदवारांनी आज अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांचे भेट घेतली. पराभवानंतर सर्व पराभूत उमेदवार एकत्र आले असून, त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना तक्रारींचा गठ्ठाच सादर केला. 

महापालिका निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे, असा आरोप प्रभाग 22 मधील शिवसेनेचे उमेदवार अनिल धावडे, वंदना इंगोले आदी अनेक उमेदवारांनी केला. प्रभाग 6 मधील असलम खान यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे परत मतमोजणीची मागणी केली असता ती फेटाळून लावण्यात आली. या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीची त्यांनी केली. या नगरसेवक, नगरसेविकांनी आज अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांना वेगवेगळी निवेदने दिली. विशेष म्हणजे ही सगळी निवेदने इंग्रजीत होती. त्यामुळे त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचे दिसून आले. अतिरिक्त आयुक्त कुंभारे यांनी उमेदवारांच्या तक्रारीवरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना खुलासा मागविण्यात येईल, असे सांगितले. 

जि. प. निवडणुकीत बॅलेट पेपरची मागणी 
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप होत आहे. यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने जनभावनेचा आदर करीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी शिवसेनेचे पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे विभागप्रमुख प्रदीप तुपकर यांनी आयोगाकडे केली आहे. 

ईव्हीएम मशीनबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात येईल. तक्रार करणाऱ्यांना लेखी उत्तर दिले जाईल. मात्र, आता फेरमोजणी शक्‍य नाही. आक्षेपकर्त्यांना न्यायालयात याचिका दाखल करता येते. यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल. 
- रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका. 

Web Title: EVMs in the jumble of complaints