बुलडाणा : माजी सैनिकाची दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावातील एका माजी सैनिकाने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गोपाल चराटे (वय, ३६) हे काही महिन्यांपूर्वीच सैन्यातील सेवा पूर्ण करून गावी परतले होते.

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुकयात एका माजी सैनिकाने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावातील एका माजी सैनिकाने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गोपाल चराटे (वय, ३६) हे काही महिन्यांपूर्वीच सैन्यातील सेवा पूर्ण करून गावी परतले होते. गावातील एका विहिरीमध्ये सराटे यांच्यासह त्यांची एक ६ वर्षीय मुलगी एक ४ वर्षीय मुलगा या तिघांचे मृतदेह
पाण्यात तरंगताना आढळून आले.

याबाबत नागरिकांनी तत्काळ खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चराटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप
समजलेले नाही. पोलिस याबाबत तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex armyman suicide with two sons in Buldhana