विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

धोटे हे विधानसभेवर 5 तर लोकसभेवर 2 वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. ते विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.

यवतमाळ - माजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे (वय 83) यांचे आज (शनिवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भावर शोककळा पसरली आहे. ते स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक होते.

सेवाग्राम ते नागपूर ही पदयात्रा त्यांनी अलीकडेच स्वतंत्र विदर्भासाठी काढली होती. ते १९७८ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बंडखोराचा पराभव केला होता. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस (आय) मध्ये प्रवेश केला होता. १९८० मध्ये ते सातव्या लोकसभेत पुन्हा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी लवकरच काँग्रेस (आय) सोडून विदर्भ जनता काँग्रेस हा स्वत:चा पक्ष ९ सप्टेंबर २००२ रोजी स्थापन केला. क्रांती धोटे -राऊत, ज्वाला धोटे भोयर या मुली आणि पत्नी माजी आमदार विजया धोटे असा त्यांच्या पश्चात परिवार आहे.

धोटे महाराष्ट्र विधानसभेवर पाच वेळा निवडून गेले होते. १९६२ मध्ये यवतमाळ विधानसभेचे त्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केले. १९६७ ची निवडून त्यांनी फॉरवर्ड ब्लॉककडून लढली. तर १९७८ ची निवडणूक ते काँग्रेस पक्षाकडून लढले. ते काँग्रेसचे तत्कालीन प्रसिद्ध नेते रामराव आदीक यांचे जावई होत. त्यांच्या पश्चात पत्नी मजी आमदार विजयाताई धोटे, दोन मुली क्रांती व ज्वाला, जावई असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने विदर्भवादी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनावर समाजातील सर्वस्तरातून शोक व्यक्त केला जात आहे

जांबुवंतराव धोटे यांचा अल्पपरिचय -

 • शारीरिक शिक्षक म्हणून मुन्सीपाल शाळेत 1958 ला 
 • 1959 मध्ये जवाहरलाल दर्डा चा पराभव करून नगर सेवक झाले 
 • 1962 यवतमाळ विधानसभा विजयी पक्ष फॉरवर्ड ब्लॉक 
 • 1964 मध्ये त्यांनी आमदार असताना विधानसभाचे अधिवेशनात दुष्काळ परिस्तिथीवर बोलू न दिल्याने अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांना सभागृहात पेपर वेट फेकून मारला होता त्यामुळे त्याची आमदारकी रद्द करण्यात आली होती हि पहिलीच कारवाई देशातील होती 
 • डिसेंबर 1964 मध्ये आमदारकी रद्द केल्याने पोट निवडणूक झाली त्यात कॉग्रेस उमेदवाराचा पराभव करून पुन्हा विजयी झाले आमदारकी रद्द करून पुन्हा आमदार 
 • 1967 मध्ये आमदार 
 • 1967 मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रराभव 
 • 1971 मध्ये नागपूर लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधीची लाट असून सुद्धा फॉरवर्ड ब्लॉक कडून विजयी 
 • 1977 मध्ये आणीबाणी
 • 1978 यवतमाळ विधानसभेत आमदार 
 • विधानसभेत इंदिरा कॉग्रेससोबत युती इंदिरा गांधींना महाराष्ट्रभर फिरून मदत केली त्यावेळी फॉरवर्ड ब्लॉक कॉग्रेस आघडीत 19 आमदार धोटे याचे निवडून आले होते 
 • 1980 मध्ये नागपूर लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसच्या तिकीटावर नागपूरहून खासदार म्हणून विजयी झाले 
 • जांबुवंतराव धोटेंनी आजवर केलेली प्रमुख आंदोलन 
 • *वेगळा विदर्भ चे आंदोलन 
 • *विणकर आंदोलन 
 • *इंग्रजी भाषा च्या विरोधात आंदोलन 
 • *अकोला येथे कृषी विद्यापीठ व्हावं म्हणून 1968 मध्ये मोठे आंदोलन उभे केले त्यात 5 लोक शाहिद झाले होते सम्पूर्ण विदर्भात हे आंदोलन झाले होते 
 • 1978 ला त्यानी "जागो" चित्रपटात मुख्य भूमिका त्यांनी केली होती
Web Title: Ex MP and pro Vidarbha leader Jambuwantrao Dhote passed away