esakal | माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील नेरची घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

Ex soldier is no more in accident in Yavatmal

किशोर भाऊराव जगताप (वय 47) असे अपघातात मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यावर सध्यास्थितीत ते भारतीय स्टेट बॅंकेच्या दारव्हा येथील शाखेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.

माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील नेरची घटना 

sakal_logo
By
गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : शहरातील रहिवासी असलेल्या माजी सैनिकाचा येथून सावंगाकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.13) सकाळी साडे पाचच्यादरम्यान घडली. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

किशोर भाऊराव जगताप (वय 47) असे अपघातात मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यावर सध्यास्थितीत ते भारतीय स्टेट बॅंकेच्या दारव्हा येथील शाखेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते दुचाकीने (क्रमांक एम.एच. 29-बीजे 9858) माणिकवाडा रस्त्यालगतच्या शेतात जात होते. त्याचवेळी सावंगा रोडवर वन्यप्राणी आडवा आल्याने त्यांची दुचाकी कोसळली. त्यात किशोर जगताप खाली कोसळून त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

दरम्यान, सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना ते रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, हा अपघात आहे की, वन्यप्राणी आडवा गेल्याने अपघात झाला की, वाहनाची धडकेने झाला, याबाबतचा तपास नेरचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश भगत, नरेंद्र लावरे, भारत पाटील करीत आहेत.

या मार्गाने वाळूची अवैध वाहतूकही जोरात सुरू असते. त्यातीलच कोण्या ट्रॅकने त्यांना उडविले असल्याची चर्चाही जोरात सुरू आहे. मृत किशोर जगताप यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. किशोर जगताप यांच्या मृत्यूने नेर व माणिकवाडा येथील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image