उत्तम पीक परिस्थितीवर पैसेवारीची मोहोर

WhatsApp-Image-2018-10-02-a.jpg
WhatsApp-Image-2018-10-02-a.jpg

अकाेला  ः जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील पिकांची (हंगामी) नजर अंदाज पैसेवारी सरासरी 73 पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. खरिपातील लागवडी याेग्य 991 गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातुन दुष्काळ गायब झाला असल्याचे दिसत आहे.

खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते.

दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. यानंतर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. 50 टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व 50 टक्क्याच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील 991 गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या 991  गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी 73 पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालातुन स्पष्ट झाले आहे.

तालुकानिहाय खरिप पिकांची पैसेवारी
तालुका गाव पैशेवारी
अकाेला 182      77
अकाेट 185        71
तेल्हारा 106      72
बाळापूर 103     71
पातूर      94     73 
मूर्तिजापूर 164  72
बार्शीटाकळी 157  76
-----------------------------------------
एकूण 991       73
-----------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com