"एक्‍साईज'ला दिसत नाही काय गावठी दारू अड्डे?

Gavthi daru adde
Gavthi daru adde

अमरावती :  राज्य उत्पादन शुल्क विभागाला शहर व ग्रामीण भागात चालणारे अवैध गावठी दारूचे अड्डे दिसत नाहीत काय, हा मुख्य प्रश्‍न निवडणूक आचारसंहिता काळात उभा ठाकला आहे. गुन्हेशाखेसह ठाण्याच्या स्तरावरून पोलिसांकडून देशी व गावठी दारू जप्तीची कारवाई झपाट्याने सुरू आहे.
शनिवारी (ता. 12) रात्री नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिस व गुन्हेशाखेच्या संयुक्त पथकाने पिंपळविहीर व शेंदोळा (खुर्द) गावात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर पाच ठिकाणी कारवाई केली. मोहा सडवा जागेवरच नष्ट केला. 55 लिटर गावठी दारूसह 56 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. संबंधितांविरुद्ध नांदगावपेठ ठाण्यात गुन्हे दाखल केले. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात ज्या पद्धतीने वाहनातून देशी, विदेशी दारूची वाहतूक सुरू आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शहरातील काही श्रमजीवी वस्तीत व आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळली जाते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी आचारसंहिता काळात गावठी दारूचाही वापर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने देशी, विदेशी व गावठी दारूच्या अवैध वाहतूक व विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, त्यापेक्षा अधिक अधिकार एक्‍साईज विभागाला आहेत. परंतु अवैध मद्य वाहतूक, विक्री रोखण्यात एक्‍साईज विभागाची समाधानकारक कारवाई अद्याप झालेली दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com