महिला सदस्यांना दौरा ठरणार खर्चिक!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

नागपूर : केरळ दौऱ्यावर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांना आपल्या खिशातून प्रवासाची अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे हा दौरा त्यांच्यासाठी खर्चिक ठरणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षांसह 15 महिला सदस्य केरळ दौऱ्यावर आहेत. केरळ येथील कन्नर जिल्ह्यात महिला बचतगटांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील महिला बचतगटांना होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून 5 लाख 20 हजारांची तरतूद करण्यात आली.

नागपूर : केरळ दौऱ्यावर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांना आपल्या खिशातून प्रवासाची अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे हा दौरा त्यांच्यासाठी खर्चिक ठरणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षांसह 15 महिला सदस्य केरळ दौऱ्यावर आहेत. केरळ येथील कन्नर जिल्ह्यात महिला बचतगटांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील महिला बचतगटांना होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून 5 लाख 20 हजारांची तरतूद करण्यात आली. जाण्या-येण्याची व्यवस्था एका खासगी संस्थेला देण्यात आली आहे. दौऱ्यासाठी सदस्यांना रेल्वेचा प्रवास मंजूर आहे. मात्र, सदस्य विमानाने गेल्याचे सांगण्यात येते. जिल्हा प्रशासनाकडून याची अप्रत्यक्षरीत्या पुष्टीही करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासावर 3 लाखांच्या जवळ रक्कम खर्च करण्याची तरतूद केली आहे. अध्यक्षांना राज्यमंत्रीचा दर्जा असल्याने विमान प्रवास मंजूर आहे. सदस्यांसाठी फक्त रेल्वे प्रवासच मंजूर आहे. रेल्वे प्रवासापेक्षा विमानाचा प्रवास खर्च जास्त असल्यास उर्वरित रक्कम सदस्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे हा दौरा सदस्यांसाठी खर्चिक ठरणार असल्याचे सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expensive to be decided by women members!