esakal | एकामागून एक आठ सिलिंडरचा स्फोट; चार तासांपासून धगधगतेय आग | fire
sakal

बोलून बातमी शोधा

Explosion of eight cylinders

एकामागून एक आठ सिलिंडरचा स्फोट; चार तासांपासून धगधगतेय आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : बायपास मार्गावरील पागल बाबानगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. येथे काम करीत असलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बाजुलाच वस्तीत केली होती. या वस्तीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय इमारतीचे काम आटोपल्यानंतर मजूर घरी गेले. स्वयंपाक करीत असताना अचानक आठ सिलिंडरचा एकामागे एक असा स्फोट झाला. याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आग काही आटोक्यात आली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर महानगरपालिकाचे उपमहापौर राहुल पावडे, अग्निशमन विभागाचे श्री. चौरे यांच्यासह फायर विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. वृत्त लिहेस्तोर कोणतीही जीवित हानी झाल्याचे समोर आलेले नाही. अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा: चुलत जावांचा शॉक लागून मृत्यू; भेटीसाठी गेली अन् गमावला जीव

अद्याप आग आटोक्यात आलेली नाही

चंद्रपूर शहराच्या बंगाली परिसराला लागूनच पागल बाबानगर आहे. याच परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज सुरू आहे. या इमारतीचे कामकाज करण्यासाठी दोनशेवर कामगार कार्यरत आहे. याच इमारतीच्या बाजूला केलेल्या वस्तीत कामगारांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. सायंकाळच्या सुमारास स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या गॅस सिलिंडरचे अचानक स्पोर्ट झाले. आगीची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. अद्याप आग आटोक्यात आली नाही. तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

loading image
go to top