अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात स्फोटके जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील भरनौली गावाजवळ (ता. अर्जुनी मोरगाव) पोलिसांनी सोमवारी (ता. 24) रात्री स्फोटके जप्त केली. ही कारवाई गोंदिया व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे केली. विशेष म्हणजे, छत्तीसगडच्या सुकमा येथे माओवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केल्याच्या घटनेनंतर राज्याच्या नक्षलग्रस्त सीमावर्ती भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. बॉम्बविरोधी पथकाने ही स्फोटके निकामी केली. 

संशयित कार्यकर्ता ताब्यात 
नक्षलसमर्थक असल्याच्या संशयावरून गोंदियातून एका मानवाधिकार कार्यकर्त्यास मंगळवारी (ता. 25) पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सदर कार्यकर्ता गडचिरोली येथील रहिवासी असल्याचे समजते.

Web Title: Explosives seized in Arjuni Morgaon taluka