मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सौदीला होणारी शेळ्या-मेंढ्यांची निर्यात रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

सरकारच्या विरोधात घोषणा देत निघालेला हा मोर्चा इतवारी, गांधीपुतळा, बडकस चौक मार्गे संघ कार्यालयात समाप्त झाला. यावेळी चेतना मंचच्या अध्यक्षा डॉ. रिचा जैन उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आंदोलनाच्या मुख्य मुद्द्याकडे लक्ष वेधत शेळ्यांची निर्यात झाली तर पुढे संत्रानगरी शेळ्यांची निर्यात करणारी नगरी म्हणून ओळखण्यात येईल, असे मत व्यक्‍त केले.

नागपूर : नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परदेशात होणाऱ्या शेळ्या-मेढ्यांच्या निर्यातीविरोधात काल प्राणीमित्र व जैन संघटनांनी उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरासमोर निदर्शने केली. यानंतर ही निर्यात थांबविली जाईल असे ट्विट मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. 

तत्पूर्वी जैन राजनैतिक चेतना मंचाच्या वतीने शुक्रवारी शहीद चौकापासून महाल संघ कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी असंख्य जैन बांधव सहभागी झाले होते. नागपुरातून परदेशात होणाऱ्या शेळ्यांच्या निर्यातीला संघाने विरोध करण्याची मागणी यावेळी जैन बांधवांनी केली.

सरकारच्या विरोधात घोषणा देत निघालेला हा मोर्चा इतवारी, गांधीपुतळा, बडकस चौक मार्गे संघ कार्यालयात समाप्त झाला. यावेळी चेतना मंचच्या अध्यक्षा डॉ. रिचा जैन उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आंदोलनाच्या मुख्य मुद्द्याकडे लक्ष वेधत शेळ्यांची निर्यात झाली तर पुढे संत्रानगरी शेळ्यांची निर्यात करणारी नगरी म्हणून ओळखण्यात येईल, असे मत व्यक्‍त केले. यावेळी सकल जैन समाज, जैन सेवा मंडळ, दिगंबर जैन परिवार ट्रस्ट, जैन सेवा तुलसीनगर, ज्ञानदेव सेवा संघ, ज्ञानोदय दवाखाना, विद्यासागर मेडिटेशन आणि मंत्र हिलिंग सेंटर तुलसीनगर, विदर्भ जैन न्यूज, विदर्भ जैन राजनैतिक चेतना मंच अशा विविध जैन समाजाच्या सामाजिक संस्था, संघटनांनी सहभाग नोंदवला. आंदोलनाला मोठ्या संख्येने पदाधिकारी आंणि जैन बांधव उपस्थित होते.

शनिवारी शेळ्या-मेंढ्यांची पहिली खेप विमानाने शारजाला पाठविण्यात येणार होती. यामुळे जैन समाजामध्ये असंतोष उफाळून आला होता. मूक जनावरांची कत्तलीसाठी निर्यात बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र निर्यातीचा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी कळविले आहे.

Web Title: Export of Goats and ships cancelled from Nagpur airport