कोरोना काळात केले संधीचे सोने : कधी जो परिसर बघून निरुत्साह यायचा, आज तेथे नवचैतन्य झाले निर्माण

The face of the school changed through public participation School news
The face of the school changed through public participation School news
Updated on

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : कोरोना काळात एकीकडे सर्व जग थांबले असताना खोलापूर येथील शिक्षक व विद्यार्थी मात्र सतत प्रवाही होते. सुटीच्या कालावधीत अगोदर कागदावर नियोजन करून नंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आणि बघता बघता गत सहा महिन्यांत शाळेचा चेहरामोहराच बदलून गेला. काल-परवा जो परिसर बघून निरुत्साह यायचा, आज त्या शाळेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. हे सर्व साध्य झाले शिक्षकांचे परिश्रम व लोकसहभागामुळे. 

परिसरात खोलापूर येथील राष्ट्रीय शेतकी शाळा आज अनेक शाळांसाठी आदर्श ठरत आहे. याच शाळेतील राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त विज्ञान शिक्षक गजानन मानकर हे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळासिद्धी विषयासाठी प्रशिक्षण तज्ज्ञ, राज्य निर्धारक म्हणून काम करतात. राज्यभरात शाळासिद्धी प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करताना चांगल्या शाळेचे दाखले देताना आपल्या शाळेचा यात कुठेही उल्लेख करू शकत नाही, याची खंत त्यांना राहायची.

२०१८ मध्ये मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्यावर त्यांनी आपल्या मनातील खंत संस्थाचालक तथा सहकाऱ्यांसमोर व्यक्त केली. इच्छा तेथे मार्ग म्हणतात त्याचा अनुभव त्यांना यायला लागला. शालेय स्तरावर सहकाऱ्यांनी मिळून हात सैल करीत शाळेचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. शाळेतील कलाशिक्षक नरेश ठवरे यांनीही प्रचंड मेहनत घेऊन भिंती बोलक्‍या केल्या.

शाळेतील बाह्य परिसराचा बदललेला चेहरा पाहून शाळेतील माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक सर्वच पुढाकार घेऊ लागले. मिलिंद हातगावकर (जबलपूर), टापर संस्था, उदय शाह, नानासाहेब मोहोड, प्रकाश पांडे, प्रकाश पोतदार, श्रीकांत नवले, निवृत्त शिक्षक विठ्ठल नवले यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली. सोबतच शासकीय अनुदानातून शालेय सुरक्षाभिंत व क्रीडांगणाचे कार्य करण्यात आले.

पालकांचाही वाटा

कडक लॉकडॉउनमुळे शिक्षकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनतीने लावलेल्या रोपट्यांना पाणी देऊन जगवायचे कसे, हा प्रश्नच होता. मात्र, येथे विद्यार्थ्यांचे पालक धावून आले. पालकांनीच कधी बैलबंडीने तर कधी कटलारिक्षाने पाणी आणून रोपट्यांना पाणी दिले आणि शालेय परिसर हिरवागार ठेवला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com