अखेर वाघीण आणि बछड्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं; शवविच्छेदनात पुढे आला धक्कादायक प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger and cubs are dead due to poison in Umred Karhandla Forest Nagpur

मृत वाघांच्या शरीराचे महत्त्वाचे सर्वच अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. अटक करण्यात आलेल्या दिवाकर दत्तुजी नागोकर (नवेगाव साधू ) याला न्यायालयाने वन कोठडी दिली आहे. 

अखेर वाघीण आणि बछड्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं; शवविच्छेदनात पुढे आला धक्कादायक प्रकार

उमरेड (जि. नागपूर) ः उमरेड-पवनी- कऱ्हाडला अभयारण्यातील उमरेड वन्यजीव क्षेत्रात शुक्रवारी (ता.१) एका वाघिणीसह दोन बछड्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज क्षेत्रतपासणी दरम्यान, तिसऱ्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पांढऱ्या रंगाची कालवड अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळल्याने मृत कालवडीवर विषबाधा केल्याचे उघड झाले. 

मृत वाघांच्या शरीराचे महत्त्वाचे सर्वच अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. अटक करण्यात आलेल्या दिवाकर दत्तुजी नागोकर (नवेगाव साधू ) याला न्यायालयाने वन कोठडी दिली आहे. 

क्लिक करा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं उघडला बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार गठीत समितीने घटनास्थळी आज दाखल झाले. त्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सहाय्यक वन  महानिरीक्षक हेमंत कामडी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून रोहित कारू, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पतोडे यांचा समावेश होता. समिती सदस्याद्वारे घटना स्थळाची पाहणी केली. 

दरम्यान, वाघीणीच्या तिसऱ्या बछड्या मृतदेह क्षेत्रतपासणी दरम्यान आढळून आला. मृत वाघांचे शरीराचे महत्त्वाचे सर्व अवयव शाबूत होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार मृत वाघीण व तिन बछड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर संकलीत केलेले नमूने आणि घटनास्थळी मृतावस्थेत आढळलेल्या कालवडीच्या कातडीचे नमुनेसुद्धा उत्तरीय तपासणी व पुढील तपासणीसाठी न्याय सहाय्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. 

जाणून घ्या - 'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

वाघीण अंदाजे चार वर्षाची असून मृत बछड्यांचे वय अंदाचे पाच महिन्याचे आहे. मृत वाघीण ही उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यामधील असून २०१३-१४ मध्ये फेज फोरमध्ये संनियत्रणानुसार या वाघीणीस भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे टी ४ या नावाने ओळखले जात होते. नागोकर याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची वनकोठडीत रवानगी केली आहे. सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजीत साजणे हे तपास करीत आहे. घटनास्थळाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी भेट दिली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Web Title: Tiger And Cubs Are Dead Due Poison Umred Karhandla Forest Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top