विदेशी महिलेशी फेसबूक फ्रेंडशिप भोवली

विदेशी महिलेशी फेसबूक फ्रेंडशिप भोवली
नागपूर : नागपुरातील एका व्यायसायिकाला लंडनच्या महिलेची फेसबूक फ्रेंडशिप चांगलीच भोवली. विदेशी युवतीने व्यापाऱ्याला तब्बल अडीच लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मकरंद प्रकाश चांदुरकर (45, रा. अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकरंद चांदुरकर हे शेअर ट्रेडिंग आणि रियल इस्टेटचे व्यावसायिक आहेत. त्यांना जेनिफर गॉरेड या लंडनमधील महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मकरंद व्यावसायिक असल्याने त्यांनी आधी जेनिफरचे प्रोफाईल तपासले. त्यासुद्धा रिअल इस्टेटच्या व्यवसायात असल्याचे दिसले. एकाच व्यावसायात असल्याने मकरंद यांनी जेनिफरची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. मैत्रीनंतर जेनिफरने भारतात येऊन व्यवसाय करण्याची इच्छा दाखविली. त्यावर मकरंद यांनी उपलब्ध जागेबद्दल माहिती करून दिल्यानंतर जेनिफरने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली.
16 नोव्हेंबर 2018 रोजी आपण लंडन येथून मुंबईमार्गे दिल्लीला येत असल्याचे जेनिफरने मकरंदला सांगितले. तसेच विमानाचे तिकीट, विमानात बसल्याचा व्हिडिओ पाठवून मकरंद यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, काही तासांनीच मकरंद यांना दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकारी असल्याचे सांगून जेनिफर हिने 5 लाख पाउंडचा डीडी विनापरवानगी व नोंदणी न करता भारतात आणला. "डीडी'च्या नोंदणीकरिता 76 हजार 700 रुपये लागतील, असे मकरंदला सांगितले त्यावर जेनिफर हिनेसुद्धा उपरोक्त रक्कम लागेल, असे सांगितले. जेनिफर आपल्या म्हणण्यावरून भारतात आली त्यामुळे आपण मदत करायला पाहिजे, अशी भावना मकरंद यांच्या मनात आली.
त्यांनी आरोपींनी दिलेल्या बॅंक खात्यात 76 हजार 700 रुपयांची रक्कम पाठविली. त्यानंतर पुन्हा आरोपींनी फोन करून "डीडी'चा मनी लॉड्रिंग प्रमाणपत्राकरिता 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली. मकरंद यांनी तीही रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात पाठविली. नंतर मात्र, मकरंद यांना शंका आली. त्यांनी इंटरनेटवरून दिल्ली विमानतळ येथे संपर्क साधून चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. या प्रकरणी फिर्यादी मकरंद यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयटी ऍक्‍टअन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com