फेसबुकच्या मैत्रीतून शारीरिक संबंध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

सिल्लेवाडा - पिपळा (डाग बंगला) येथील एका २२ वर्षीय युवतीचे फेसबुकच्या माध्यमातून एका युवकाशी प्रेम जुळले. त्याचे रूपांतर शारीरिक संबंधात झाले. परंतु, नंतर मात्र युवतीशी लग्नाला नकार दिल्यामुळे युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार केली. युवकास अटक करण्यात आली.

सिल्लेवाडा - पिपळा (डाग बंगला) येथील एका २२ वर्षीय युवतीचे फेसबुकच्या माध्यमातून एका युवकाशी प्रेम जुळले. त्याचे रूपांतर शारीरिक संबंधात झाले. परंतु, नंतर मात्र युवतीशी लग्नाला नकार दिल्यामुळे युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार केली. युवकास अटक करण्यात आली.

भूपेश प्रभाकर बोंद्रे (वय २२, वलनी) याची २०१५ मध्ये याची पिपळा (डाकबंगला) युवतीशी ओळख झाली. फेसबुकची मैत्री प्रेमात बदलली. दोघांनीही एकमेकांचा नंबर शेअर करून व्हॉट्‌सएपवर ‘चॅटिंग’ सुरू केले. फेसबुकवर एकमेकांशी जवळीक निर्माण झाली. भेटीगाठीदरम्यान दोघांनीही एकमेकांच्या संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती एकटी असताना कधी तिच्या घरी, कोराडी येथील हॉटेल, सावनेर येथील केशव लॉजमध्ये भेटून त्यांनी संबंध सुरूच ठेवले. त्यांच्या प्रेमाची चर्चा घरापर्यंत पोहोचली. भूपेशच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध दर्शविला. तेव्हा पीडित युवती २५ जूनला त्याचा घरी पोहोचली. भूपेश, त्याचे आई वडील व इतर नातेवाइकांसमोर लग्न करण्यास विनंती केली.

दोघांचे ही एकमेकांवरती प्रेम असून अनेकदा शारीरिक संबंध झाले असल्याचे सर्वांसमोर सांगितले. मात्र, सर्वांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर तिने भूपेशशी भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, भूपेशचे आईवडील, काका, काकू यांनी तिला जातिवाचक शिवीगाळ करून भूपेशशी भेटण्यास इंकार केला. यामुळे तिने बुधवारी खापरखेडा पोलिस ठाणे गाठले व पोलिसांत रीतसर तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भूपेश प्रभाकर बोंद्रे यास अटक केली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक कातगडे करीत आहेत.

Web Title: facebook friendship physical relation crime cheating