
अविनाश साबापुरे
यवतमाळ : रविवारी सुटी असतानाही विद्यार्थ्यांना आहार वाटप केल्याच्या नोंदी करून राज्यातील शेकडो शाळांनी जादा बिल वसुलीचा प्रयत्न केला होता. मात्र, आता सुटीच्या दिवशी आहार वाटपाची नोंदच होणार नाही, अशी तरतूद एमडीएम पोर्टलमध्ये केली जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी अधिवेशनात स्पष्ट केले. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बनावट आहार वाटपाला ‘फुलस्टॉप’ लागणार आहे.