Land Dispute Leads to Murder : सख्खा भाऊ झाला पक्का वैरी !'धाकट्याकडून माेठ्या भावाची निर्घृण हत्या'; शेताच्या धुऱ्यावरून वाद
Brother Kills Brother Over Farm Dispute : शेतातील हनुमान मंदिराजवळ शंकर यांचा लहान भाऊ बाबाराव नानाजी येळणे यांच्याशी वाद झाला. वाद विकाेपाला गेला बाबाराव यांनी त्यांचा मुलगा यांच्यासह शंकर येळणे यांना मारहाण केली आणि तलवारीने वार करून त्यांची हत्या केली.
From Kin to Killer: Farm Boundary Dispute Leads to Brother’s Murderesakal
देवळी : शहरापासून दाेन किलाेमीटर अंतरावर असलेल्या दिघी (बोपापूर) येथे धाकट्याने माेठ्या भावाची तलवारीने निर्घृण हत्या करण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. मंगळवारी (ता. १०) दुपारी ही घटना घडली. शंकर नानाजी येळणे (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.