esakal | कामगाराचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर होता पडून; आर्थिक मदतीसाठी कुटुंबीयांचे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Family of a late worker protested against company for financial help

रात्री व्यवस्थापन आणि कामगार संघटनेच्या प्रतिनिधीत झालेल्या चर्चेत मृताच्या कुटुंबीयाला दहा लाख, तर कारखान्यातील विमा कवचच्या माध्यमातून 25 ते 30 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कामगाराचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर होता पडून; आर्थिक मदतीसाठी कुटुंबीयांचे आंदोलन 

sakal_logo
By
मंगेश बेले

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) ः बामणी प्रोटिन्स येथील रसायन टाकीची स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या एका कामगाराचा मृत्यू, तर पाच कामगार जखमी झाल्याची घटना घडली. रात्री मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी आर्थिक मोबदल्यासाठी मृत व्यक्तीचे प्रेत कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठेवले. 

रात्री व्यवस्थापन आणि कामगार संघटनेच्या प्रतिनिधीत झालेल्या चर्चेत मृताच्या कुटुंबीयाला दहा लाख, तर कारखान्यातील विमा कवचच्या माध्यमातून 25 ते 30 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करून देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

बामणी प्रोटिन्स येथे हाडांपासून प्रोटिन्स पावडर तयार करण्याचा कारखाना आहे. येथील टाकीत विशिष्ट प्रकारच रसायन तयार केले जाते. टाकी रोज स्वच्छ करावी लागते. पंधरा फुटाच्या या टाकीत शिडीने कामगार उतरतात. शुक्रवारी सर्वप्रथम विशाल मावलीकर उतरला. मात्र टाकीत ऑक्‍सिजनची मात्रा कमी होती. त्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला. 

त्याच्या पाठोपाठ शैलेश गावंडे, बंडू निवलकर, मनोज मडावी, कपिल मडावी, अविनाश चौधरी हे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. रात्रीच्या सुमारास मृत यावलीकरच्या कुटुंबीयांनी आर्थिक मोबदल्यासाठी विशाल मावलीकर याचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी स्थानिक नेते आणि भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेने नुकसानभरपाई देण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली. 

रात्री साडेअकरा वाजता व्यवस्थापनाने मागणी मान्य केली. त्यात पीडित कुटुंबाला तत्काळ 10 लाखांची तर कारखान्यातील विमा सुरक्षा कवच'च्या माध्यमातून 25 ते 30 लक्ष रुपयांची आर्थिक तरतूद, कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरीसह अंत्यविधी खर्च देण्याच्या करारातून हे आंदोलन शमले. रात्री 12 वाजताच्या सुमारास मृत व्यक्तीचे प्रेत मूळगावी दहेली येथे नेण्यात आले. 

क्लिक करा - जीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

अपघातातील सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्याची आणि उपचारादरम्यान त्यांना पूर्ण वेतन देण्याची मागणी कामगार संघटनेच्या आणि स्थानिक नेत्यांनी लावून धरली होती. व्यवस्थापनाने ही मागणी मान्य केली. यावेळी झालेल्या चर्चेत व्यवस्थापनातर्फे सतीश मिश्रा, व्यवस्थापक केशवानी, चौहान, तर भारतीय मजदूर संघाचे रमेश यादव, निंदेकर, उलगुलान संघटनेचे नेते राजू झोडे, दहेलीचे सरपंच योगेश पोतराजे यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image
go to top