कुटुंब रंगलय खेळात, आजी-नातवंडांचा पत्त्यांचा डाव!

patte
patte

राजूरा ( चंद्रपूर ) : कोरोनाने जुने दिवस परत आणले असे म्हणायला हरकत नाही. आधीची जीवनशैली आजच्या इतकी व्यस्त नव्हती. मुलांवरही अभ्यासाचे जोखड आजच्याइतके नव्हते. मुख्य म्हणजे सेल फोन आणि सोशल मीडिया यांचे प्रस्थ वाढले नव्हते. त्यामुळे माणसांजवळ एकमेकांसाठी कुटुंबासाठी वेळ होता.कोरोनामुळे असा निवांत वेळ पुन्हा एकदा सगळ्यांच्या वाट्याला आला आहे. आणि कुटुंब गप्पांमध्ये खेळांमध्ये रंगू लागली आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. घरातच राहण्याचा सूचना प्रशासन देत आहे. विरंगुळा म्हणून टिव्ही,मोबाईल बघून वैतागलेले कुटूंब आता करमणूकीसाठी लुप्त झालेल्या खेळाकडे वळले आहे. राजूरा तालूक्यातील रामपूर येथील आजी आपल्या नातंवंडासोबत सत्ती लावणीच्या खेळात रमल्या. या निमित्ताने त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सविस्तर वाचा - हुश्श! यंदाचा उन्हाळा गाठणार म्हणे पा-याचा   उच्चांक
 लॉकडाऊनमुळे घराबाहेर निघणे जिकरीचे झाले आहे. विनाकारण बाहेर निघणाऱ्यावर पोलिस विभागाने कारवाईचा सपाटा चालविला आहे. त्यामुळे घराबाहेर निघणे लोक टाळत आहेत. अशात कुटुंबासोबत गप्पागोष्टी करण्यात,टिव्ही बघण्यात घरातील सदस्य रमले आहेत. सारखे टिव्ही,मोबाईल बघून वैतागलेले अनेक कुटूंब आता लूप्त झालेल्या पारंपारिक खेळाकडे वळत आहेत. चंगाअष्टा,सापशिडी, पत्ते या जुन्या खेळात  कुटूंब रमताना दिसत आहे.  रामपूर येथील सत्तर वर्षीय वच्छला उरकुडे या आजी आपल्या नातवंड व मुलांसोबत पत्त्यांच्या खेळात रमल्या.या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. टिव्ही,मोबाईलमुळे आपआपसातील संवाद हरवला आहे. त्यामुळे नात्यात दूरावा निर्माण झाला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com