कौटुंबिक कलह : आईची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या| Family strife | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

well

कौटुंबिक कलह : आईची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : रागाच्या भरात घरून निघालेल्या महिलेने दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Mother commits suicide with two children) केली. ही घटना तालुक्यातील मालडोंगरी शेतशिवारात रविवारी (ता. ९) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दीपाली रवी पारधी (वय ३०), पीयूष (वय ६) व आयुष (वय ३) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. कौटुंबिक कलहातून (Family strife) ही घटना घडल्याची चर्चा आहे.

तालुक्यातील मालडोंगरी येथे पारधी कुटुंबीय राहते. शेतावर कामाला जात असल्याचे सासूला सांगून दीपाली पारधी ही पीयूष आणि आयुष या दोन मुलांना घेऊन घरून निघाली. मात्र, सायंकाळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने गावात व शेतशिवारात शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही शोध लागला नाही.

हेही वाचा: माँ जिजाऊंच्या राजवाड्यासमोर उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

रविवारी पुन्हा शोध घेण्यात आला. तेव्हा ब्रह्मपुरी-मालडोंगरी रस्त्यानजीकच्या एका शेतातील विहिरीत महिलेच्या व दोन मुलांच्या चपला तरंगताना दिसल्या (Jump into the well). घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक रोशन यादव, सहायक पोलिस निरीक्षक अनिल कुमरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास गेडाम, विजय मैंद, उमेश बोरकर यांनी घटनास्थळ गाठले.

विहिरीतील पाण्यातून महिलेचे व दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह काढण्यात आले. मृतदेह ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. कौटुंबिक कलहातून (Family strife) घटना घडली असल्याची चर्चा आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट दिली.

Web Title: Family Strife Mother Commits Suicide With Two Children Jump Into The Well Chandrapur District Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top