नामवंत महाविद्यालयांच्या दादागिरीवर बसणार चाप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या नामवंत महाविद्यालयांच्या दादागिरीवर आता चाप बसणार आहे. विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले असल्याने एकाच महाविद्यालयात होणारी गर्दी आता यापुढे ओसरलेली दिसून येणार आहे. दुसरीकडे यामुळे डोनेशनच्या नावावर होणारी विद्यार्थ्यांची लूटही थांबणार असून प्रवेशात पारदर्शकता येणार आहे.

विद्यापीठाचा व्याप बराच मोठा आहे. दरवर्षी 70 हजारांहून विद्यार्थी पदवी तर 15 हजार विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया ही बारावीचा निकाल लागल्यावर बीएसस्सी, बीकॉम आणि कला शाखेसहित इतर शाखांत प्रवेशास सुरुवात होते. विद्यापीठातील तिन्ही शाखांचे हे ऑफलाइन होतात. यातही विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने प्रवेश लवकरच संपत होते. यामुळे विद्यापीठांकडे अतिरिक्त जागांची मागणीही वाढत होती. मात्र, दुसरीकडे बऱ्याच महाविद्यालयांमध्ये या शाखेच्या जागा रिक्त असल्याचे चित्र होते. याचाच फायदा घेत, नामवंत महाविद्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर "डोनेशन' घेऊन विद्यार्थ्यांची लूटमार केली जाते. त्यामुळे आता प्रवेशात पारदर्शकता आणण्याच्या हेतूने पदवी व पदव्युत्तर विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी विद्यापीठाने पुढील शैक्षणिक सत्रापासून संपूर्ण प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयाने प्रवेशासाठीच्या भटकंतीपासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक "चॉइस' देण्यात येणार असल्याने हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश करताना अडचणी येणार नाहीत.

प्रवेशप्रक्रियेत एकसूत्रता
सध्या ऑनलाइन प्रकियेचे युग असून संपूर्ण विभाग हे डिजिटल होत आहेत. अनेक तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात. अशाप्रकारे विद्यापीठही केंद्रीय प्रवेशप्रक्रिया अवलंबणार असल्याने प्रवेशप्रक्रियेत एकसूत्रता येणार आहे. पहिल्या वर्षात केवळ पदवी अभ्यासक्रमातील प्रवेश घेण्यात येतील.

Web Title: The famous College of bullying and keep pressure