समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्याची थेट सरणावर उडी

राम चौधरी
शुक्रवार, 12 मे 2017

प्रभाकर बाजड या शेतकऱ्याकडे साडेसात एकर जमीन आहे. त्यातील सहा एकर जमीन प्रस्तावित महामार्गात जाणार आहे.

वाशीम : कृषी समृध्दी जलदगती महामार्गाच्या विरोधात मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क सरण रचून त्यावर उडी मारल्याची घटना आज (शुक्रवार) दुपारी घडली. गावकऱ्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

वाशीम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मूंबई कृषी समृध्दी जलदगती महामार्गाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे. वेळोवेळी आंदोलनाचा व निवेदनाचा पवित्रा घेतल्यानंतरही सरकार प्रक्रिया थांबवत नसल्याने केनवड येथील शेतकरी प्रभाकर शामराव बाजड (वय 55) यांनी शेतात सरण रचून त्यावर उडी घेतली.

आजबाजूच्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यानी धावत जाऊन बाजड यांना सरणावरून खाली उतरविले. प्रभाकर बाजड या शेतकऱ्याकडे साडेसात एकर जमीन आहे. त्यातील सहा एकर जमीन प्रस्तावित महामार्गात जाणार आहे. मुलीचे वैद्यकीय तर मुलाचे अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू आहे. शेती महामार्गात गेली तर मुलांचे शिक्षण व जगण्याची चिंता यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

Web Title: farmer attempts to suicide against samruddhi higway