संतप्त शेतकऱ्याने तोडले बॅंकेचे काउंटर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

चांदपूर (जि. भंडारा) -  चार दिवसांपासून बॅंकेत चकरा मारूनही रक्कम मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने काउंटरवरील काच फोडली. काच हाताला लागल्याने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत दवाखान्यात हलविण्यात आले. तुमसर तालुक्‍यातील सिहोरा येथील जिल्हा बॅंकेत गुरुवारी (ता. 1) ही घटना घडली. प्रभाकर शंकरलाल पारधी, रा. मांगली असे शेतकऱ्याचे नाव आहे.

सिहोरा हे भागातील मोठे गाव असून, 43 गावांतील नागरिक केंद्रस्थानी असलेल्या येथील बाजारपेठेवर अवलंबून आहेत. नागरिकांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार याच गावातून होतात. बॅंक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा वगळता अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक, जिल्हा सहकारी बॅंक व पतसंस्था येथे आहेत. 

सरकारने 8 नोव्हेंबरपासून नोटाबंदी लागू केली. पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. तेव्हापासून नोटा बदलसाठी उसळलेल्या बॅंकांमधील गर्दीचा जोर अद्याप कायम आहे. गेल्या 15 दिवसांपासून "कॅश संपली" या आशयाची पाटी विड्रॉल सुरू झाल्यानंतर काही वेळातच लावली जाते. आज रांगेत रकमेसाठी ताटकळत असलेल्या प्रभाकर पारधीलाही तीन दिवसांपासून याच प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. आज पुन्हा तीच वेळ आल्याने त्याचा संयम सुटला. शेतीचा हंगाम सुरू असल्याने बी, बियाणे, चुकारे तोडण्यासाठी पैसे कुठून आणावे असा, प्रश्‍न त्याने उपस्थित केला. 

Web Title: farmer broke the bank counter