पीककर्ज वाटप न करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’
शेतकऱ्यांच्या शेती विषयक तसेच पीककर्ज विषयक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनव्दारे प्रत्येक गावात एक दिवस शेतकऱ्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजन 30 जून 2018 रोजी केले होते. शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा त्यासाठी कामाला लावली होती.

अकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दणका दिला. अकोला येथील अॅॅक्सिस बँकेच्या खात्तातील 45 कोटीच्या शारकीय ठेवी काढून घेतल्या.   

अकोला जिल्ह्यातील 1 लक्ष 15 हजार शेतकऱ्यांना 486 कोटीच्या  कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ ही योजना राबवून नवीन पीककर्जाचे वाटप करण्याची सूचना अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांना केली होती. शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दर शुक्रवारी 15 जुलैपर्यंत मंडलनिहाय कर्ज मागणी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यासाठी  निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अडचण निर्माण करतील किंवा पीककर्ज देण्याबाबत टाळाटाळ करतील अशा बँका विरूध्द कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक पूर्ण करू न करणाऱ्या काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. अशा बँकामध्ये कोणत्याही शासकीय ठेवी ठेवण्यात येणार नाही, आहे त्या ठेवी काढून घेतल्या जातील, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतरही अकोला येथील अॅक्सीस बँक शाखेने पीककर्ज वाटप करण्यात टाळाटाळ केली होती. त्यामुळे या बँकेतील 45 कोटीच्या शासकीय ठेवी काढून घेण्यात आल्या आहेत.

पीककर्जासाठी राबविलेल्या उपयायोजना
० शेतकऱ्यांसाठी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ योजना
० नवीन पीककर्ज घेताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दर शुक्रवारी मंडळनिहाय मेळावा
० पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक पूर्ण न करू शकणाऱ्या बँका काळ्या यादीत
० शेतकऱ्यांना पीककर्जासाठी येणाऱ्या अडचणीसाठी टोल फ्री क्रमांक 1077 सुरू केला

‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’
शेतकऱ्यांच्या शेती विषयक तसेच पीककर्ज विषयक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनव्दारे प्रत्येक गावात एक दिवस शेतकऱ्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजन 30 जून 2018 रोजी केले होते. शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा त्यासाठी कामाला लावली होती.

Web Title: farmer crop loan bank problem in Akola