वाघिणीच्या हल्ल्यात शेतकरी ठार

शेतानजीकच्या जंगलात बैल चारत असताना टी- ६ वाघिणीने हल्ला करून एका शेतकऱ्यास ठार केले.
tiger
tigersakal
Summary

शेतानजीकच्या जंगलात बैल चारत असताना टी- ६ वाघिणीने हल्ला करून एका शेतकऱ्यास ठार केले.

गडचिरोली - शेतानजीकच्या जंगलात बैल चारत असताना टी- ६ वाघिणीने हल्ला करून एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली.

सुधाकर भोयर (वय-५०) रा. राजगाटा चेक असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुधाकर भोयर हे गुरूवारी बैल घेऊन आपल्या शेतावर गेले होते. शेतालगतच्या जंगलात बैल चारत असताना अचानक भोयर यांच्यावर वाघिणीने हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला.

वारंवार वाघाच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हल्ला करणारी टी-६ वाघीण असल्याचे पाेर्लाचे वनपरीक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले. या वाघीणीने आतापर्यंत ६ जणांचे बळी घेतले आहेत. राजगाटा चेक परिसरात टी-६ वाघिणीचे अस्तित्व असून, दोन दिवसांपूर्वी ती वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आली. त्यामुळे वनविभागाने परिसरातील नागरिकांना नोटिसीद्वारे जंगलात न जाण्याची सूचना केली होती. तरीही नागरिक बिनधास्तपणे जंगलात जात असल्याने वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com