ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, गावावर शोककळा

आनंद चलाख
Monday, 16 November 2020

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील साईनाथ मेश्राम या शेतकऱ्याने रानटी डुकरांच्या संरक्षणासाठी वीज खांबावरून शेताभोवताल वीज तारा पसरवत असताना वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आळी.

 


गोंडपिपरी (चंद्रपूर) : शेतात वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करणाऱ्यासाठी लावलेल्या विजेच्या जीवंत तारांच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दिवाळीच्या दिवशी घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा...

जंगलाला लागून शेती असल्याने वन्यजीव पिकांचे नुकसान करतात. त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विजेच्या जीवंत तारा लावतात. धाबा परिसरातील धान कापणीच्या कामाला वेग आला आहे. अशास्थितीत वन्यजीवांच्या हैदोस धान पिकासाठी नुकसानदायक ठरत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील साईनाथ मेश्राम या शेतकऱ्याने रानटी डुकरांच्या संरक्षणासाठी वीज खांबावरून शेताभोवताल वीज तारा पसरवत असताना वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

हेही वाचा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

मृत साईनाथच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले, असा परिवार असून सदर घटनेने गोजोली गावात शोककळा पसरली आहे. दिवाळीच्या काळात  घडलेल्या या प्रकाने कुटुंबीयांवर आघात झाला आहे. याप्रकरणाचा  तपास धाबा पोलिस करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer died by electric shock in gondpipari of chandrapur