अखेर "त्या' शेतकऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

आनंदवन : वरोरा तालुक्‍यातील पांझुर्णी येथील शेतकऱ्याने सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे कंटाळून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येतात तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला. परंतु, मागील 25 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या या शेतकऱ्याची गुरुवारी (ता. 26) अखेर प्राणज्योत मालवली. रमेश बेलखुडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पांझुर्णी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश बेलखुडे यांच्याकडे बारा एकर शेती होती. शेतातील उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, मागील काही वर्षांपासून होणारी सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे ते सतत चिंतेत होते. 1 जानेवारीला रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांनी घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 25 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 26 जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. बेलखुडे यांच्यावर सेवा सहकारी संस्था, बॅंक ऑफ इंडिया शाखा माढेळीचे चार लाखांचे कर्ज असल्याचे समजते.

Web Title: farmer dies after taking poisen

टॅग्स