वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; दोन शेतमजूर जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

सेलू (जि. वर्धा) : मुसळधार पाऊस सुरू असताना वीज कोसळून वडगाव (कला) शिवारात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन शेतमजूर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. आज, बुधवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव सुभाष संतोष बोबडे (वय 70) असून ते वडगाव (कला) येथील रहिवासी आहेत.

सेलू परिसरात आज सकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुभाष बोबडे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. शेतात मोबाईलवर बोलत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. तसेच शेतमजूर अशोक बाबूलाल व अनिल गुलाबराव भलावी (दोघेही रा. वडगाव कला) गंभीर जखमी झाले. त्यांना प्रारंभी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून दोघांनाही सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक बाबूलाल यांची परिस्थिती गंभीर असून, अनिल भलावी धोक्‍याबाहेर आहेत. घटनेची नोंद तलाठी तसेच तहसीलदारांनी घेतली असून, शासनाला ताबडतोब या घटनेचा अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies due to electricity, two farm laborers injured

टॅग्स