शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

गोंदिया : शेतात नांगरणी करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.11) सकाळी साडेआठच्या सुमारास चिचेवाडा येथे घडली. देवेंद्र शामलाल गेडाम (वय 40) असे मृताचे नाव आहे. देवेंद्र भावासोबत शेतात नांगरणी करण्याकरिता गेला होता.
शेतात नांगरणी करीत असताना नांगर शेतात उभा ठेवून लगतच्या झुडपात शौचाकरिता गेला. काही वेळाने जोरात ओरडला. या वेळी शेतात काम करत असलेला देवेंद्रचा भाऊ तिथे गेला असता तो मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies in the field

टॅग्स