फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कुरखेडा (गडचिरोली) : शेतात तण नाशकाची फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी येथे घडली. गुरुदत्त कोवे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

कुरखेडा (गडचिरोली) : शेतात तण नाशकाची फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी येथे घडली. गुरुदत्त कोवे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गुरुदत्त कोवे हे आज सकाळी गावालगत असलेल्या आपल्या शेतातील अनावश्यक तण नष्ट करण्याच्या हेतूने तणनाशक फवारण्यासाठी गेले होते. त्यांनी पिकावर 'टॉप ऑप ५३' नामक तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर ते घरी परतले. काही क्षणातच त्यांची छाती भरून आली. श्वासोश्वास घेताना त्यांना त्रास होऊ लागल्याने लगेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चिरचाडी गावांवर शोककळा पसरली आहे.

Web Title: Farmer dies while spraying