वन्यप्राण्यांनी धुमाकुळ घातल्यानं शेतकरी त्रस्त, अनोखी शक्कल लढवली अन् झाला निश्चिंत

संदीप राऊत
Thursday, 18 February 2021

मोझरी येथील शहजाद रज्जाक शेख या युवकाने आपल्या दोन एकर शेतात हरभरा लावला. यावेळी पहिल्यांदाच समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा आहे. परंतु, वन्यप्राण्यांचा हैदोस पाहता रात्रंदिवस शेताचे रक्षण करूनही नुकसान टाळता येत नव्हते.

मोझरी (जि. अमरावती) : सध्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युवकांच्या कल्पक बुद्धीमत्तेतून नवनवीन स्टार्टअप उदयास येताना दिसून येत आहेत. परंतु, कुठल्याही कार्यशाळेत तांत्रिक शिक्षण न घेता निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोझरी येथील युवा शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतालाच एलईडी लाइटचे कुंपण करून पिकांच्या रक्षणासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

नेहमीच आपल्यातील सुप्तगुणांनी वेगवेगळे प्रयोग यशस्वी करणाऱ्या मोझरी येथील शहजाद रज्जाक शेख या युवकाने आपल्या दोन एकर शेतात हरभरा लावला. यावेळी पहिल्यांदाच समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा आहे. परंतु, वन्यप्राण्यांचा हैदोस पाहता रात्रंदिवस शेताचे रक्षण करूनही नुकसान टाळता येत नव्हते. यापूर्वीच वन्यप्राण्यांनी कपाशी व मका या पिकांचे अतोनात नुकसान केले. तेव्हा काहीही झाले तरी चालेल, पण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार करून शहजाद याने अतिशय कमी खर्चात लाइटचे कुंपण घालून आपला प्रयोग यशस्वी केला. यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास आटोक्‍यात आला असून रात्रीच्या अंधारात लाइटच्या झगमगाटाने चकाकणारे शेत पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी कुतुहलाने हजेरी लावताना दिसून येत आहेत.

हेही वाचा - लग्नासाठी वर-वधू होते तयार; मंगलाष्टक सुरू असतानाच झाले सर्वकाही शांत; वधूपक्षावर ओढवली नामुष्की

स्वस्त व सुरक्षित उपाय -
आज सर्वत्र वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे. त्यासाठी शेतात विद्युत शॉक वगैरे लावण्याचा बरेचजण प्रयोग करतात. परंतु, त्यामध्ये खूप मोठी जोखीम आहे. वन्यप्राण्यांना मारणे हा उद्देश नसून त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा एलईडी लाइटचे कुंपण अत्यंत सुरक्षित असून आपला उद्देश शंभर टक्‍के साध्य झाला आहे. रेजिस्टंन्स, वायर व बॅटरीच्या साहाय्याने हे कुंपण तयार केले असून यासाठी प्रती एकर पाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो, अशी माहिती शहजाद शेख याने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer doing fence of LED light in the field in mojhari of amravati