ऑनलाईन शेतकरी आरक्षणाची देशभरात प्रचंड नोंदणी

राजेश सोळंकी
रविवार, 1 एप्रिल 2018

एकच मिशन .. शेतकरी आरक्षणही शेतकरी यांची चळवळ. व्यापक चळवळ असुन  याला मोठ्याप्रमाणात जनप्रतिसाद लाभतो आहे याची दखल शासनाला घ्यावीच लागेल असा आत्मविश्वास प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.

आर्वी (जि. वर्धा) : शेतकरी आरक्षण या किसान आरक्षण वेबसाईडच्या संकेतस्थळावर शेतकरी व जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला असुन, आजपर्यंत रविवार (ता. १) 1 लाख 54 हजार 220 नागरिकांनी शेतकरी आरक्षणाच्या बाजुने मत नोंदवुन समर्थन दिले आहे, तर चौघांनी असमर्थन दिले आहे.

शेतकऱ्यांच्या आश्वस्त रक्षणासाठी आरक्षण हिच दीर्घकालीन विकासात्मक उपाययोजना असुन, यासाठी आपणहि सहभागी व्हा मतदान करा असे आवाहन www.kisanarakshan.com या संकेतस्थळवर एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी केले होते.

शेतीमालाला भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण प्रकल्पग्रस्र्त व दूधउत्पादकाचे प्रश्न कायम स्वरुपात सुटावे. यासाठी आर्वी (जि. वर्धा) येथील उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्यांने मागिल वर्षी सेवाग्राम येथिल बापूकुटी येथून एकच मिशन शेतकरी आरक्षणला सुरुवात केली होती. या मोहीमेत अनेक ग्रामपंचायत आणि कृषि उत्पन्न बाजार समिती सामिल होऊन त्यांनी शेतकरी आरक्षणाचे ठराव पारित करुन शासनदरबारी पाठवले.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही पुणे येथे एका कार्यक्रमात शेतकरी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन शेतकरी आरक्षणाबद्दल भूमिका विशद केली होती. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही शैलेश अग्रवाल यांचेकडून शेतकरी आरक्षण भूमिका समजावून घेउन वरिष्ठ पातळीवर हि बाब पाठवणार असल्याचे सांगितले.

यातून पुन्हा प्रेरणा घेउन गुढीपाडवा या दिवशी शेतकरी ..आरक्षण .. किसान आरक्षण या नावाने www.Kisanarakshan.com संकेतस्थळ तयार करुन .. आपनही सहभागी व्हा मतदान करा असे आवाहन करण्यात आले. यात शेतकऱ्यांचे नाव .. भ्रमणध्वनी.. गाव.. जिल्हा.... शेतकरी आरक्षणाचे समर्थक आहात का? शेतकरी आरक्षणाला विरोध आहे का? असे नमूद आहे. हिंदी व मराठी या भाषेत नोंदणीची सोय उपलब्ध असुन या संकेतस्थळावर देश आणि देशाबाहेरील नागरिक यांनी आपले मत मांडले आहे. 

एकच मिशन .. शेतकरी आरक्षणही शेतकरी यांची चळवळ. व्यापक चळवळ असुन  याला मोठ्याप्रमाणात जनप्रतिसाद लाभतो आहे याची दखल शासनाला घ्यावीच लागेल असा आत्मविश्वास प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.

Web Title: farmer reservation online campaign Shailesh Agrawal