दिसला वाघ अन् मग काय बसला ना झाडावरच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

वरुड (अमरावती) : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पुसली शेत शिवारामध्ये एक युवा शेतकऱ्याला सायंकाळचे सुमारास एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे त्याने शेतातीलच कडु लिंबाच्या झाडावर चढुन तब्बल दोन तास आश्रय घेतला. अखेर मध्यप्रदेशातील खडकी येथील गावकऱ्यांच्या मदतीने झाडाखाली उतरून युवा शेतकऱ्याचे प्राण वाचल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील पुसला येथील शेतकरी जमील कुरेशी यांच्या पुसली शेतशिवारामध्ये काल (ता. 7) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास युवा शेतकरी प्रविण श्यामराव वाहने याला पट्टेरी वाघ आढळून आला. त्यामुळे प्रविण वाहने याने जीव वाचविण्याकरीता एका झाडावर चढून आश्रय घेतला.

या दरम्यान तो वाघ त्याच परीसरात फिरत असल्याने रात्री 9 पर्यंत प्रविण झाडावरच बसला राहला. याच दरम्यान प्रविण वाहने याने या घटनेची माहिती सातनुरचे सरपंच डोंगरे यांना मोबाईल वरून दिली आणि सरपंच डोंगरे यांनी गांभीर्य लक्षात घेता शेंदुरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम, उपविभागीय महसुल अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत लांबाडे तसेच जिल्हा वनपरीक्षेत्र अधिकारी यांना दिली.

घटनेची माहिती मिळताच शेंदुरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम दल बलासह तसेच वनविभागाचे अधिकाऱ्यांनी रेस्क्यु ऑपरेशनची तयारी करून घटनास्थळाकडे धाव घेतली. तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील खडकी येथील काही गावकऱ्यांनी हातात काठ्या व मशाली घेउन घटनास्थळ गाठले तोपर्यंत वाघ जंगलाकडे निघुन गेला. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रविण वाहनेला झाडावरू खाली उतरविले. घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे मिळुन आल्याने हा पट्टेरी वाघ असल्याचे सुध्दा निषपंन्न झाले. त्यामुळे वनविभामार्फत आजूबाजूच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला. तर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर तळ ठोकून आहे.

Web Title: Farmer saw tiger at Varud village in Amravati